हे न माझे एकट्याचे खूळ आहे
सर्व पुरुषांच्याच भाळी डूल आहे
पाळतो सारे नियम बिनचूक आम्ही
पंच म्हणती'हाच तर फाऊल आहे'
काम नसल्यागत फिरे वेटर उगीचच
का रिकामा अजुन हा बाऊल आहे
मी कुठे दिसताच सारे मित्र म्हणती
'आमचे हे नेहमीचे कूळ आहे'
राजकारण एवढ्या गेले थराला
वेगळी सासूसुनेची चूल आहे
भांडणे ही रोज, सारी तप्त डोकी
लावला एसी तसे घर'कूल' आहे
नायगारा पाहुनी म्हटले कवीने
'रे विधात्या, ही तुझी तर चूळ आहे'