निळे जांभळे अति अद्भुत अन्,
लाल, केशरी,सुवर्णवेष्टित..
अर्पुनि अपुले रंग निधीला,
संध्याराणी पुजे सागरा....
लाल, केशरी,सुवर्णवेष्टित..
अर्पुनि अपुले रंग निधीला,
संध्याराणी पुजे सागरा....
सागर वदला संध्याराणी,
विस्मित मी तव रंगपूजेने..
मजसि ओढ परि चंद्रकलेची,
झुरतो तिजप्रति मनोमनी....
संध्या वदली मोदभराने,
रे मित्रा, बस्स्..बघ हासोनी..
इंद्रधनूच्या पुलावरोनी,
चंद्रकला येइल उतरोनी....
सागर-चंद्रकलेचे मीलन,
घडवुनी आणी संध्याराणी..
रंग आपुल्या प्रीतीचे अन्
देई जगावरी उधळोनी....
बध्द करी जी,कसली प्रीती?
बंधमुक्त प्रीती करी..
खर्या प्रीतीची अक्षरगाणी,
अजुनी गाते संध्याराणी.......