नाच गं घुमा !

दोन घडीच्या तुझ्या सहवासाला...
मी समजून बसते...
आयुष्यभराच्या निचंतीची शिदोरी.

तू परतीच्या वाटेला लागलेला...
कधीचाच...
मी मात्र स्वतःशीच आळवत...
'झिम्माड पोरी... झिम्माड पोरी... झिम्माड पोरी !