वचन

स्वप्नात पाहावेसे वाटते तुला,
स्वप्नात तुझ्यासोबत जगण्याची,
थोडीशी परवानगी देशील???

हातामध्ये हात नको,
आयुष्याची साथ नको,
बोटांचा एक स्पर्श आणि आयुष्याचा एक क्षण देशील???
स्वप्नात तुझ्यासोबत जगण्याची,
थोडीशी परवानगी देशील???

प्रेमाचीही बात नको,
प्रणयाची ती रात नको,
बोलक्या तुझ्या डोळ्यातले थोडेसेच प्रेम देशील???
स्वप्नात तुझ्यासोबत जगण्याची,
थोडीशी परवानगी देशील???

सत्य मला मान्य आहे,
पण स्वप्न फक्त माझंच आहे,
स्वप्नात नित्य येण्याच,
आज मला तू वचन देशील????
स्वप्नात तुझ्यासोबत जगण्याची,
थोडीशी परवानगी देशील???