रोजनिशी

मनोगतींनो,

केलेल्या कामाची नोंद करणे मानवी इतिहासात नेहमी महत्वाचे होतेच.
हल्ली तर आयटी,ऑटोमोबाईल किंवा कोणतीही इंडस्ट्री असो, केलेल्या कामाची नोंद करून ठेवणे फार महत्वाचे झालेले आहे.
Documentation विषय तर जणू काही नवीन विषय आहे, असा हाताळला जात आहे. 
कधी कधी या गोष्टीकडे दुर्लक्ष होते. 'काय केले, ते आपल्याला माहीत आहे ना मग कशाला लिहून ठेवायचं...' या विचाराने नोंदी ठेवल्या जात नाहीत.
नंतर मात्र काहीही आठवत नाही, पाहिजे तेव्हा पाहिजे ती माहिती मिळत नाही. 

प्रत्येक शतकात नावे बदलत गेली, तरी मुद्दा जुनाच आहे.
दुसया कोणाला माहिती दाखवणे सोडून देऊ, किमान स्वतःचे स्वतःला कळले पाहिजे की विशिष्ट दिवशी विशिष्ट वेळेला काय केले, हा विचार या नोंदींमागे असावा.      

कुठेतरी याचे मूळ रोजनिशी लिहिण्यात असावे.

रोजनिशी लिहिण्याची परंपरा कधी सुरू झाली ?