पंख पसरून पिल्लानं
आकाश फिरून यावं.
संध्याकाळी हळूवार
घरट्यामध्ये शिरावं.
एकट वाटलं जर कधी,
तर घरी निघून यावं
आईच्या कुशीत डोक ठेऊन
शांत झोपून जावं.
हरवल्यासारखं वाटलं तर
बाबांजवळ बसावं,
त्यांच्या शांत डोळ्यांकडे
क्षणभर बघावं.
एक दिवस पिल्लाचं
पाखरू होऊन जावं,
कधी न परतण्यासठी
दूर उडून जाव.
खुल्या आभाळात स्वतःसाठी
एक घरटं बांधाव
आकाश फिरणाऱ्या आपल्या पिल्लंना
पंखाखाली घ्यावं