बटाट्याची भाजी (ठेचून केलेली)

  • पाव किलो बटाटे ( लहान मद्रासी बटाटे घ्यावेत अथवा मोठे बटाट्यांच्या ४ फोडी करून घ्याव्यात. )
  • एक कांदा, ३-४ हिरव्या मिरच्या, ६-७ लसणीच्या पाकळ्या, २ टीस्पून जिरं,
  • फोडणीचं साहित्य, साखर, मीठ, तेल.
३० मिनिटे
२-३ जणांसाठी

बटाटे  स्वच्छ धुवून घ्यावेत. सालासकट कच्च्या बटाट्याच्या फोडी करून पाट्यावर किंवा खलबत्यात किंचित ठेचून घ्याव्यात. हिरव्या मिरच्या, लसणीच्या पाकळ्या, जिरं मिक्सर मधून वाटून घेवून हे वाटण बटाट्यांच्या फोडींना लावावे. तेलावर फोडणी करून त्यात कांदा परतून घ्यावा. नंतर वाटण लावलेले बटाटे घालून चांगली वाफ आणावी. बटाटे शिजत आल्यावर चवीपूरते मीठ, साखर घालून चांगले परतावे. सर्व्ह करताना वरून कोथिंबीर पेरावी.

ही भाजी फक्त वाफेवरच शिजवावी.

मैत्रीण