तु यावंस मोगऱ्याच्या कळ्या घेवून
अन जावंस त्याची फुलं घेवून
तु यावंस ओठांच्या पाकळ्या घेवून
अन जावंस माझे गीत घेवून
.
तु पहावंस काळ्याभोर नयनांनी
अन मिटाव्यात पापण्या घेवून माझ्या प्रतिमांनी
तु हसावंस या गाली खळी पाडूनी
अन लाजावंस माझ्या या स्पर्शानी
.
तु भिजावंस या जलधारांनी
अन शहारावे माझ्या मिठीतुनी
तु चालावेस या हिरवाईवरुनी
अन सावरावेस माझ्या हातांनी
.
तु यावेस माझ्या जीवनी
अन कधीही न जावे आयुष्यातुनी
तु लाभावीस मला जन्मोजन्मी
अन मिलन व्हावे आपले मनोमनी