सारखे शिंकीत जाशी...

राजा बढे यांच्या चांदणे शिंपीत जाशी...  या गीताने आम्हाला पुर्वी एकदा प्रेरणा दिली होती तेव्हा चाळ ही हदरून जाते ची निर्मिती झाली होती
आज आम्हाला पुन्हा एकदा ह्याच गीताने प्रेरणा दिली

सारखे शिंकीत जाशी का असे तू चंचले
वेंधळी पाहून मुर्ती हासती सारी मुले

वाहते नाकात गंगा ना कटी रूमाल ही 
मोकळे नाका करोनी हात पदरा पूसीले

शिंकूनी जीव हा बेजार की पायी हिच्या 
मी अशा शिंकेवरी, सर्दीवरी वैतागले 

घे जरा वाफा घशाला झाक अन काया तुझी
पाहू दे सर्दीविण मज नाक तूझे मोकळे