विडंबन

घोरले ते झक्क, त्यांना हालवावे लागले
एवढे ते घोरले की जागवावे लागले

गवसला नाही मला श्रीमंत कोणी सासरा
अन अखेरी बिनविवाहाचे रहावे लागले

लोक खेटायास आले वाढत्या गर्दीमध्ये
हाय हिल सँडल मला हातात घ्यावे लागले

मी कशी विसरेन त्यांना पाहिले मी ज्या क्षणी
घसरुनी ऍडमिट मला तेव्हाच व्हावे लागले

राहिले आजन्म कोरे बँक बुक माझे घरी
अन दुज्यांच्या लोनवर मजला जगावे लागले

एकदा केव्हातरी मी बटण 'कविते'ला दिले
'शिवून दे लवकर' कितिदा भुणभुणावे लागले