युद्ध

.

आई आई लवक्कर ये मोट्ठी गाडी आलीय
बाहेर ना सगळ्यांची कित्ती गर्दी झालीय
चष्मेवाल्या काकांसोबत बंदुकवाला उभाय
त्यांना किनै आपल्यासोबत एक फोटो हवाय
कसल्याशा कागदावर तुझी सही घेणार
आणि म्हणे शेतासाठी सगळं सामान देणार
आपल्या पण शेतात मग छान पीक येईल ना
रुसून गेला बाबा पण हसून परत येईल ना
.
.
.

(देव करो आणि असे विषय न मिळोत...)