प्रेमे नादली पंढरी..

मेघ आषाढाचा गर्जे
गाज गूंजे चराचरी
प्रेमे नादली पंढरी
उभा बघून श्रीहरी

मी बालक अजाण
मन सोडिना पदर
माझी बालकाची मती
त्यास कोठला आधार

दिंडी चालली माहेरा
वाट ओली अंतरीची
उभी लेकराच्यासाठी
माय सावळी कधीची

अश्रू वाहती सहज
आज आनंद सोहळा
मायभेट उराउरी
भाव कोवळा सांभाळा

मुमुक्षू