... ते तसे नाहीत ना, मी...

आमची प्रेरणा शैलेश कुलकर्णी यांची सुंदर गझल  ... ते तसे नव्हतेच, पण...  

ते 'तसे' नाहीत ना, मी ते तपासून पाहिले,
मी जरा त्यांच्यातले नाते तपासून पाहिले...

रोज रात्री ढोसली की, सोडुनी मज एकला,
नेमके, हे घर कुठे जाते? तपासून पाहिले...

त्या तिच्या नरड्यात होते अडकलेले काय, ते
का असे रेड्या परी गाते? तपासून पाहिले...

जाणिले, जे गायले, का गायले? माझेच मी
काल या छातीतले भाते तपासून पाहिले...

रोज ती पळते तरीही, ती अशी फुगली कशी?
कोणते हे पीठ ती खाते? तपासून पाहिले...

... केशवसुमार