एक शिल्प

एक शिल्प
.

गोंडस प्रेमदूत,
त्याच्या बाहूंत ती..
कोमल गोजिरी!
त्यानं हातात घेतलेला..
तिचा हात,
गालावर टेकलेले ओठ.

आहा! हा..
मन मोहरत गेलं..

तेव्हाच लक्षात आले..
हातात हात घेऊन!
तिचा चेहरा वळवणाऱ्या,
त्याच्या पाठीवरचे पंख..
:
:
आणि
तिच्या पाठीवरली..
दिसेल न दिसेल अशी,
झुळझुळीत ओढणी!

==================
स्वाती फडणीस.............. २००७