(निवृत्ती) एक नवा छन्द

छळू नको तू असे केशवा

तूझी साहित्यास गरज आहे

वाव्वा टाळ्या खूप मिळवल्यास रसिकांच्या

जवाबदरी उपकारांची तुझ्यावर आहे

कळेना, कसली प्रतिमा कसले जाळे

निवृत्ती म्हणजे पाण्यात राहून माशाशी वैर आहे

नको घाबरू विडंबनकारांच्या वाढीने

विडंबनाचा धंदासुद्धा वाढत आहे

सहकारी म्हणून विनंती करतो तूजला

तूझ्या निवृत्तीने वाचक गलबलतो आहे

खूप झाले विनंती, आर्जव केशवा

परतण्याचा आदेश मी देत आहे

  

नका तळमळू, हळहळू रसिकानो

कूत्र्याच्या शेपटीची गोष्ट सार्वाना माहीत आहे

जित्याची खोड मेल्याशिवाय जात नाही

केशवा, तूझ्या परतीची सर्वाना खात्री आहे.