पसरता सभोवती धुंद केतकी हवा
रान पेटले असे मेघ तु मला हवा..
शिंपिता नभातले चांदणे तनावरी
घुमू लागला मनी पारव्यांचा थवा..
सप्तरंगी नाहता मधाळ स्मित चुंबिता
मनी दाटला असा,अवीट एक गोडवा..
तू मला लपेटता, श्वास उष्ण गुंफता
मनामध्ये पसरला धुंद कुंद गारवा..
रात्र थांबली जणु, रात्र लांबली जणू
खेळ प्रीतीचा असा बहरला नवानवा..
मैफिलीत ह्या तुझ्या तनीमनीमी गुंतले
झंकारले मनातुनि बोल हेच वाहवा..
ऐक रे सख्या अता, निवांत शांत स्तब्धता..
रोग तृप्त भोगला, नको मला अता दवा..
घसरला अजाणता , पाय हा असा कसा
करू नकोस रे सख्या.. कधी कुठे शूSSS.. गवगवा..
--------- योग्या