अस्तित्व पुसुनी जाण्याची का
व्यर्थ मनी मी भीती धरून होतो
विसरून सर्व गेले इतक्यात लोक मजला
हृदयी कधी जयांच्या मी वस्ती करून होतो
ते सखे सोबतीच सारे माझे
शब्दासही महाग झालो ज्यांच्या
मैफिली जमवुनी तयांच्या
रात्रंदिन मी गप्पात रंगलो होतो
आता शोधत जाणे स्वतःच स्वतःला
कशास पाहावी तुटक्या आधाराची वाट
अन का धरावा भरवसा माणसांचा
उतरताच ऊन्हे जेव्हा सावलीही सोडते पाठ