भारनियमन

  बार नियमन, भारनियमन
सरकारचे हे फार नियमन

  मी कसा उपकार मानू
संमेलनी आभार नियमन

  माहिती संयम मलाही
होताच पोरे चार.....नियमन

  एक पत्नीव्रत, पतीही
युवकांस सांगा यार नियमन

  श्रावणा येतोस का तू?
हा पेग करतो ठार नियमन

  सर्व रस्त्यातून खड्डे
वाळू खडी अन टार नियमन

  वावडी उठते कधीची
शहरातले उठणार नियमन

  स्वप्न ग्लोबल पाहुनी घ्या
शांघायचे हे दार... नियमन

  जॅम ट्रॅफिक अन प्रदूषण
शहरात होवो कार नियमन