श्रावणातील सण
होता श्रावणाचे आगमनं
सुरू होते सणांची उधळणं
गोड धोड मिळे खायला
आणि सुट्ट्यांना उधाणं
प्रथम येते नागपंचमी
फुलोऱ्यावाचून हिची महती कमी
काढून सर्पनक्षी देवघरा
त्यापुढे सान-थोरही नमीं
मग येते पौर्णिमा नारळी
जमती सारे बांधव कोळी
पूजती त्या सागरदेवतेला
जो त्यांना हो सांभाळी
दिन हा रक्षाबंधनाचा
भावा-बहिणीचं नातं जपण्याचा
वचन बहिणीला देऊन
रक्षण तिचे करण्याचा
साजरा होतो गोपाळकाला
पाळणी घालून श्रीकृष्णाला
गल्लोगल्ली रचती मनोरे
बाळगोपाळ दहीहंड्या फोडाया
वर्षभर नांगरणाऱ्या मळा
हा तर बैलांचा सोहळा
बळी होऊन कृतज्ञ
फुटे मैदानी हा पोळा
असा संपे हा श्रावण
मनी पावित्र्य साठवून
वेध लागती गणरायांचे
घरी होण्या विराजमानं
-अथांग सागर