***** **** **, ** ** ** ** ।ध्रु।
B.A. केलं अन् M.A. केलं
गमे आता की उगीच केलं
काम नाही, बस, बाकी इथं
*** *** ** **** ** ।१।
हवापाणी देशाचे तसे स्वच्छ आहे
न्याय आणि इथे कायदाकानू आहे
देव जाणे इथे कोणी जगे वा मरे
माणसास खून-बिन सर्व माफ आहे
आणि काय सांगू ?
छोटी- मोठी चोरी
अन् लाचखोरी
यावर करतोय गुजराण इथे
*** *** ** **** ** ।२।
गोल गोल पोळीचे चाक पळे
पाठी त्याच्या चांदीचा रुपया पळे
पोळीला बिचाऱ्या त्या घारीनं नेलं
चांदी घेउन काळतोंड्या कावळा पळे
आणि काय सांगू
मृत्यूचा तमाशा
चालतो आताशा१
जगण्याची फुरसद नसे हो इथे
*** *** ** **** ** ।३।
१ :- या ओळीत भाषांतरात सूट घेतली आहे.
चाल : मूळ गाण्याचीच.
१. हे कोणत्या हिंदी गाण्याचे भाषांतर आहे ते ओळखा.
२.भाषांतरातील चुका जरूर सांगा. सुधारणाही सुचवा.
(ध्रुवपद छन्न ठेवलेले आहे : प्रशासक)