एक घर ..आणि त्याभोवती
एक लहानशी बाग ,बागेत फुललेला गुलाब
माझ्या डोळ्यासमोर सगळे तसेच आहे
दुष्काळ, पूर, वारा वावटळ ...
सगळे नियमाने आले.. गेले..
अजून ते घर तसेच असेल का?
कदाचित कधीच नाहिसे झाले असेल
त्या जागी मोठी इमारत, एखादे हॉटेल काय उभे असेल?
माझ्या बंद पापण्या जपलेल
माझ स्वप्न मात्र कायम माझेच , तसेच आहे..