फासें

सापशिडीच्या खेळात
'९८'  च्या सापाला चुकवायचं आहे
कवड्यांच्या खेळात
'तीन पाय कुत्रं' टाळायचं आहे
'पांच, तीन दोन' मध्ये
कुणाचेतरी हात ओढायचे आहेत
'नाठेठोम' मध्ये
अजुन, सगळ्या जोड्या जिंकायच्या आहेत
कॅरम मध्ये
कधीतरी,  क्वीनचे 'कव्हर' घ्यायचे आहे
आयुष्याच्या 'ल्युडोत'
अजून सहाचे 'दान'  पडायचे आहे !