जाणिवेच्या पल्याड

जाणिवेच्या पल्याड पहायचा
बरेचदा प्रयत्न होतो
नसलेल्या रंगात नहाण्यात
मी अनेकदा मग्न होतो
 
ते असतं
एका भिंतीवरून पलीकडे पाहणं
डोकं पलीकडे टाकलं  
तरी पायांचं अलीकडे राहणं

वाटतं, ते आहे
पलीकडे पाहता पाहता पल्याडचंच होणं
खरं तर ते असतं
अल्याड राहून आत्ममग्न होणं