झुकलेल्या तुझ्या नजरेखाली
ओंजळ माझी तु भरलेली,
सोबतीच्या क्षणात एका
आयुष्ये ही सरलेली..
डोळ्यात या हरवून तुझ्या
रात्र सारी ही उरलेली,
पुन्हा मला हरविण्यासाठी
मिठी तुझी ती पुरलेली...
नजरे आडच्या दुराव्यात
नजर माझी आसुसलेली,
शोधुनी तु जरा देशिल का
स्वप्ने माझी हरवलेली....
हवी हवी आहे जगण्या अता
सोबत तुझी ती जगलेली,
तु ये ना प्रिये घेवून "बहर"
ईथे सारीच पाने झडलेली.....
जयेन्द्र.