रुद्राचे अवतार आम्ही
वादळाला भीत नाही,
आमुच्या वाटेला अडवा
सह्याद्रीही येत नाही.
तुडवीत जातो रान आम्ही
तुड्वीत जातो कातळ कडे,
सह्यद्रीच्या रांगेवरती
दुमदुमती रुद्राचे चौघडे.
बुरुजावरती थांबतो जेव्हा
घेउन जरी पटक्याची निशाणी,
आमुच्या साठी तिमिरातून
पेटती काजव्यांच्या मशाली.
आडवळणाच्या वाटा आमुच्या
आमुची मराठ्यांची कुळी,
आम्ही काट्यांची वाट चालतो
जपण्या ही "भगवी कळी"