बाप्पा मोरया..

बाप्पा मोरया..
.

जाळी झाडली.. झाडली..
पुटं काढली.. काढली..
रंग दिला घरा नवा..
या चैतन्य भराया.. या
या कौतुक कराया.. या
या.. बाप्पा मोरया.. या
बाप्पा मोरया..

पाचोळा झाडला.. झाडला..
सडा घातला.. घातला..
रांगोळी घेतली काढायाला..
या रंग भराया.. या
या कौतुक कराया.. या
या.. बाप्पा मोरया.. या
बाप्पा मोरया..

तोरण लावलं.. लावलं..
घर सजलं.. सजलं..
घेतला उत्सव करायाला..
या आनंद भराया.. या
या कौतुक कराया.. या
या.. बाप्पा मोरया.. या
बाप्पा मोरया..

आसन मांडलं.. मांडलं..
आवतान धाडलं.. धाडलं..
मनी करतो सदा धावा..
या लेकरा बघायाला..
या आशीर्वाद द्याया.. या
या कौतुक कराया.. या
या.. बाप्पा मोरया.. या
बाप्पा मोरया..

फुल आणली.. आणली..
समयी तेवली.. तेवली..
पुजा घालतो तुझी देवा..
या मंगल कराया या..
या कौतुक कराया.. या
या.. बाप्पा मोरया.. या
बाप्पा मोरया..

पंचखाद्य मांडली.. मांडली..
पंचामृते जोडली.. जोडली..
नैवेद्य एकवीस मोदकांचा..
या गोडवा भराया या..
या कौतुक कराया.. या
या.. बाप्पा मोरया.. या
बाप्पा मोरया..

ताल धरला.. धरला..
नाद घुमला.. घुमला..
बोल बोबडा बालकाचा..
या गाणं म्हणाया या..
या कौतुक कराया.. या
या.. बाप्पा मोरया.. या
बाप्पा मोरया..

चित्ती भरला.. भरला..
क्षण भारला.. भारला..
भिजलो मायेत गणपित्या..
या छायेत घ्याया या..
या कौतुक कराया.. या
या.. बाप्पा मोरया.. या
बाप्पा मोरया..

गणपित्या बाप्पा मोरया..
बाप्पा मोरया..
बाप्पा मोरया..

====================
स्वाती फडणीस.......... ०८-०९-२००८