काही शिकावे लागले

काही शिकावे लागले काही कळावे लागले
नाही जरी म्हटले तरीही श्वास घ्यावे लागले

जुळल्या कधी संवेदना ? कळल्या कधी का यातना ?
विळख्यात प्रश्नांच्या सुखाने बागडावे लागले

कोठे निराशा कोवळी अन् जीवनाशा कोरडी
कैशा जराशा भावनांनी फरफटावे लागले

शंका कुशंका भांडणे, पापा लिफाफा लाजणे
देऊन वचने घट्ट हाती अंतरावे लागले

देवा पुरा फसलास ! मी आलोच नव्हतो मागण्या,
मज सूख देणे का बरे तुज आठवावे लागले...

(ही कविता [गझल म्हणता येईल का हिला ?] मी याआधी ओर्कुट वर सादर केली आहे)