मानवता

सिमीत आहेत मनुजा, आयुष्याच्या गाठी!

मानवा सोडुनी तंटा ,जग तु मानवतेसाठी!!

चौखुर उधळीत धावू दे, रथ श्रमाचा समयापाठी !

गाठ्शील  शिखर यशाचे, करुनी दुर सर्व आडकाठी!!

वंदतील मग सकल जन, नाम तुझे घेवुनी ओठी!

करुणा दया प्रामाणिकता, बाळग सदा सचोटी!!

रचली हि कविता सुधिरने, रुळेल सर्वाचे ओठी !!!