कका ची बाराखडी (भारूड)

चाल- काट्याच्या अणीवर वसले तीन गांव...

ककाच्या नांवावर काढल्या मालीका
ककाच्या नांवावर काढल्या मालीका
काही सूरू काही संपेचना

संपेचना ठार केले नायकाला
नायीका रडते व्हीलन बधेचिना

बधेचिना रीपीटले ब्राउन तुकडे
फॉरवर्ड करती प्रेक्षक बघेचिना

बघेचिना त्याचा केला पुनरजनम
पुनरजन्मानी नायीका तरुण पुन्हा

तरुण पुन्हा दादीचे केस काळे
डिस्को करते दादी खपेचिना

खपेचिना तिने मारल्या तीन थपडा
तीनदा लागल्या एपीसोड सरेचिना

सरेचिना टाकले कमरशीयल ब्रेक
चहा ढोसूनही प्रेक्षक टळेचिना

टळेचिना पाडल्या नवीन कहाण्या
वाढता वाढे बाराखडी संपेचिना

वाढता वाढे ककाराचा विकार
मूर्ख बघे टीव्ही सोडेचिना

अज्ञ अरुण म्हणे मालीकेचा अनुभव
सारखा देऊन एकता सोडेचिना

नांवावर ककाच्या काढतेय मालीका
नांवावर ककाच्या काढतेय मालीका