गणपती, अतिरेकी आणि वृत्तवाहिन्या

प्रत्येक वृत्तवाहिनी वर गणपती विसर्जन आणि दिल्ली बॉंब स्फोटाच्या विदारक दृश्यांची विदारक चित्रे बघून फारच XXX (शब्द सापडत नाही) वाटले......
 
एकीकडे लालबागचा राजा वैभावात मिरवला जात होता आणि खाली स्क्रोल बार वर दिल्लीतील मृतांची नावे आणि वय येत होते....
मन सुन्न झाले........

काही वाहिन्यांवर शिवराज पाटील यांचा फॅशन शो दाखवत होते, किती तासात किती कपडे साहेबांनी बदलले हे दाखवत होते...

काय चालले आहे, कोणास ठाऊक आहे का? निदान पंतप्रधान आणि राष्टपतींना तरी ठाऊक आहे का?