गुलमोहराच्या रानात

गुलमोहराच्या रानात
उनाड मन हे
तुझ्या वाटेवर विसावले
भुतकाळातल्या त्या क्षणात
अलगद जाऊन गुंतून गेले
गुलमोहराची फुले पायाखाली तुडवताना
जवळकीचे नाते जाणवायचे तसे
मी झाडाकडे पाहत राहिली तर, तु बोलायचास
झाडू घेऊन साफ करायचे काम तुला दिले पाहिजे
सोबत तुझ्या मस्करीची
चिड यायची कधी कधी
माझ्या गुलमोहराच्या वेडाला हसायचास ना म्हणून
आता सा-या वाटा एकट्या राहिल्या
कारण तु आता तिथे नाही आहेस
तु तर त्या गुलमोहरातल्या आठवणींतला
गुलमोहर होऊन बसला आहेस ना!