पाऊस 'मी' म्हणतोय....
अरूंद शेडखाली दोघे....
एकाची फाटकी झोळी तर दुसरा लॅपटॉपसह..
एक शहारून, अंग चोरून...
दुजा सावरून, नाकास रुमाल लावून..
दोन दिशेला... दोघे..
........................... पाऊस 'तू' म्हणाला....
पागोळ्या झिरमिरल्या........
खपाटीस गेलेल्या आतड्यात आग जागली...
त्याने सुरकतलेला मळकट हात पसरला..... दान हवं म्हणून..
त्याचा जळजळीत... तुच्छ कटाक्ष..........
जाळून गेला आगीला.........
लॅपटॉपची पकड घट्ट करत.. झपाझप पावले टाकत... तुंबलेल्यातून वाट
काढत तो निघाला............. कारण...........
भुक त्याचीही जागली होती................ दान त्यालाही हवं होतं.