संजीवनी आयुष्यात
ध्यास घ्यावा अशी तू
दिशा ही प्रेरणेची घेवून
नेमके भाव अलगद भाव उमटत
शरदाच्या चांदण्यांसारखी सोबत
साक्ष ही अनेक खडतर क्षणांची
यशाची चव घेताना आपण सारेच
लीला या गोजऱ्या दोन जीवांच्या पाहत
सावलीसारखे आपण दोघे सतत
हिमनगासारखे टणकन पण आतून मायेने विरघळत
लक्ष लक्ष दीपांचे ज्योत हातांच्या ओंजळीत तेवत
अगणित सुख-दुखांची बेरीज
जवळीकीने एकत्र बांधलेली
गाठी ह्या स्वर्गातून बांधल्या जातात ना
वळणावरच्या पाऊलवाटेवर
कस्तुरींच्या सुगंधात तुझे-माझे नाते
रविकिरणांसारखे तेजाळत राहावे