नको विचारू...

नको रे असा
हट्ट धरूस,
नको विचारूस काही..
नको लावूस
सांगायला,
मनातले सारे काही..

काही सांगताना,
काय लपवायचे
ते कळणार नाही मला..
जे लपवायचे,
तेच नेमके
सांगून बसेन तुला..

काळजाच्या कुपीत
बंदिस्त असणारे,
मुग्ध भाव सारे..
डोळ्यातल्या
पाण्याबरोबर
वाहून जातील ना सारे.....