झटपट बटाटा पोळी

  • २ पोळ्या,
  • १ उकडलेला बटाटा,
  • लाल तिखट,
  • मीठ,
  • जीरं-धने भुकटी,
  • तेल
१५ मिनिटे

१ उकडलेला बटाटा घ्यावा.  त्यात आवडीनुसार लाल तिखट,  मीठ, भाजेलेली जीरं-धने भुकटी घालावी. ही भुकटी 
तयार नसल्यास नुसते जीरे घातले तरी चालते.  हे मिश्रण नीट मळून एकजीव करावे.  नंतर शक्यतो जर शिळी 
पोळी असेल तर ती घ्यावी.  तिच्या अर्ध्या भागावर हे मिश्रण नीट लावून उरलेला अर्धा भाग करंजी प्रमाणे त्यावर 
पालथा घालावा.  तसेच दुसऱ्या पोळीच्या बाबतीत ही करावे.  आता तव्यावर मंद आचेवर हे दोन्ही भाग ठेवावेत व 
बाजूने चमच्याने किंचित तेल घालावे.  उलथण्याने ही पोळी हळूवारपणे दाबत राहावी.  दोन्ही बाजू लालसर कुडकुडित 
झाल्या की ह्या पोळ्या खाली काढाव्यात.  पोळीचा वरचा भाग उलथण्याने उघडावा.  एकदम वाफेचा लोट येईल.  
तो जाऊ द्यावा.  पोळी थोडी निवली की परत वरचा भाग लाऊन फ्रँकी प्रमाणे खावे.    

पौष्टिकतेसाठी इतर भाज्या बारीक चिरून पण घालता येतात.  मात्र त्या शिजायला वेळ लागतो.  पोळी करपू 
शकते.  कारण ती आधीच बनवलेली असते.  मात्र सिमला मिरची,  कांदा व इतर भाज्या वेगळ्या वाफवून घेऊन 
नंतर त्या शिळ्या पोळीत ठेवून फ्रँकी बनविता येते. तो जरा वेळखाऊ प्रकार आहे.   

वरील बटाटा मिश्रणात मी थोडे तीळ सुद्धा घालते.   

घर