तहान.....

मेघ दाटले अंबरी, ऊरी तुझा ध्यास
मेघातून येती सरी, जशी तुझ्या आठवणींची बरसात॥

भिजली माती, गंध पसरला सारा
तुझ्या आठवणी मोराचा फुलला पिसारा ॥

पाणी वाहत चालले, धरुनी या वाट
तुझ्या नावाचा जप, जसे करीती माझे ओठ ॥

गार वारयाचा स्पर्श सुखावतो शरीरा
तुझा रेशमी स्पर्शाने अंगी रोमांच स्फुरला ॥

तृप्त झाली धरती, बरसून तृप्त झाले आसमान
सखे तुझ्या मिलनाशिवाय कशी शमेल माझी तहान ॥

----- नितिज.....