मन उडते आकाशी, पंख माझे कापलेले,
पाय धावतात पुढे, रस्ते सारे थांबलेले..
थांबलेल्या वाटेवर, वाट पाहे वाटसरू,
म्हणे मला, चल सखे, चल हात हाती धरू..
चल हासत, हासत सखे, वाट पार करू,
सखे क्षितिजाच्या पार, खोपा प्रीतीचा उभारू..
कशी येऊ जिवलगा, माझी सुटेना रे बेडी,
प्राण घेतसे भरारी, जडशीळ माझी कुडी..
दुरुनच छेडी धून, मोहकशी बासरीची,
सप्तस्वरांच्या लयीत, आस विरेल मायेची.........