भोंडला

भोंडला
==============================

अंबे... भोंडला घालूदे!
भोंडला घालूदे..

पाटावरती हत्ती रेखून ऐरावत पुजूदे..
अंबे... भोंडला घालूदे!
भोंडला घालूदे..

अक्षरांचा शब्द विरून नाद उरूदे..
अंबे... भोंडला घालूदे!
भोंडला घालूदे..

झिम्मा फुगडी घालून काजळरात संपूदे..
अंबे.. भोंडला घालूदे!
भोंडला घालूदे..

ओंजळभर तळ्यात झुकून निळाई पाहूदे..
अंबे.. भोंडला घालूदे!
भोंडला घालूदे..

==============================
स्वाती फडणीस................................ ०८-१०-२००८