तुझ्या आठवणींवरून
हात फिरवताना
होणारा स्पर्श ही
अधिक जवळचा वाटतो.
तु अधिक जवळ वावरल्याचा
भास ही क्षणभर जाणवतो.
तुझ्या सहवासातल्या
कितीतरी क्षणांची मालिका
डोळ्यांसमोर उभी राहते
मिश्रित भावना जागतात.. अशा क्षणीं
तू इतक्या दूर गेला आहेस
तिथे माझी हाक देखील पोचणार नाही
जिथे आपण भांडायचो,
रुसायचो,
भांडणं मिटायची,
तुझ्या माझ्या भावविश्वातील
स्वप्नंफुले सजायची....
ती जागा आता कोरडी वाटते
तुझ्याविना एकटी जाणवते
एकामागून एक
अशा कितीतरी आठवणीं जागत राहतात
पुस्तकाची पाने एकामागून एक पलटत राहावी तशीं
त्या जागेवरून नजर फिरवताना
डोळे भरून येतात
तु जिथे जिथे वावरायचास
तिथपर्यंत नजर फिरून येते
ती नजर ही
मी एकटी आहे असे जाणवते
तू आता तिथे वावरत नाहीस असे खुणवते......