चांदण्यातली रात्र
सोबत ही चांदण्यांचीच
झुरझुरते गात्र
अन स्मरते तुझ्या सुखद स्मृतींचीच
स्तब्ध असा तू
अबोल चाफेकळी जशी मी
उलगडतात मनीं नि:शब्द भावनांची
तळमळलेली एक रात्र
आकाश मुठीत सामावून सारे जग जिंकण्याची
ती हळवी आशा सारंच दु:ख गिळून
सुख लपेटण्याची मात्र
किती म्हणून क्षण आठवावे
तुझ्या पारिजात सहवासाची
क्षण क्षण आठवता अधूरी राहील ही रात्र.