मेघ भरून आल्यावर
प्रत्येक वेळी ते बरसतात अस नाही
पण...
मन भरून आल्यावर
केव्हा
आठवणींचा ओला श्रावण बरसतो,
कळत सुध्हा नाही.
श्रावण बरसल्यावर मन रितं होतच अस नाही,
पण
एक काम होत , मन थोडं हलकं होत,
थोड्या आठवणींची जागा कमी होते
आणि मग,
नव्या आठवणी येतात ,
ती जागा व्यापण्यासाठी..