हरहुन्नरी प्रज्ञा ताई!!!

तिच्याशी पहिली भेट झाली ती सन २००१ मध्ये मी माझ्या आई-बाबांबरोबर नवीन फ्लॅट बघायला गेले होते तेव्हा. आपल्या नवर्याबरोबर फ्लॅटच्या डिलर बरोबर फ्लॅट ठरवायला. असेल एक ३० शी मधली. पण कपल मात्र भनाट दिसत होते. एकमेकाला साजेल असे.

आई माझी म्हणजे सगळ्यान्शी आपणहून ओळख करून घेणारी.. लगेच आईने मुद्याला हात घातला.पहिला प्रष्ण "काय आडणाव तुमचे ? "( इथे उद्देश जात विचारण्याचा होता हे काही सांगायला नको ... मराठी लोकाना सवय असते नाही ). ती म्हणाली "प्रज्ञा कुलकर्णी " आणि हा "सुहास". असे म्हटल्यावर आईला हायसे वाटले ( शेजार आपल्यापैकी असल्याचे समाधान तिच्या चेहर्यावर दिसत होते).. मी ते टिपले आणि बहुतेक प्रज्ञा ताईनेही. एव्हाना मी तिच्याशी ताईचे नाते जोडले होते.

मग आम्ही राहायला आलो. ओळख पाळख मस्त झाली. प्रज्ञा ताई "डेक्कन कॉलेजला" "रिसर्चर" म्हणून अजुनही आहे. रोजच्या गपपा टप्पा सुरू झाल्या. ती कॉलेजमधून यायची आणि आमचे दार उघडे दिसले कि आत येऊन आईला ऑर्डर "काकू कॉफी करता का? " मग निदान ३० मिनि. तर ती गप्पा मारत बसायची.

प्रज्ञा ताई च्या स्वभावाबद्दल काही :- अतिशय मनमिळावू , मनमोकळ्या गप्पा मारणारी, तिला काही येत नाही असे नाहि.. नेम एनिथिंग ऍंड शी इज देअर असा स्वभाव ... आणि प्रसंगी मॉडर्न आणि प्रसंगी ट्रेडिशनल.. असे मी म्हणते कारण "कसले मस्त किर्तन करते .. काय आवाज आहे.. आणि हो हि बर्याच वर्तमानपत्रातल्या पुरवण्यान्म्धे लिहिते बरे का. तिचा आजच इसकाळ वेबसाइट वरती ऑडियो आला आहे " कार्पोरेट जगातील नमुनेदार माणसं " ह्या नावाने संडे स्पेशल इथे तुम्ही ती ऐकू शकता. प्रज्ञा ताईने डॉक्टरेटही मिळवली आहे बरे का.

गौरी गणपती मध्ये तिच्याकडे दरवर्षी टु गुड गौरी सजलेल्या असायच्या. मी अशा उभ्या गौरी तिच्याकडेच सजलेल्या बघितलया. मजा यायची. मग हळुहळू प्रज्ञा ताई च्या घरी एक गोंडस बाळ आले. तिचे नावही तिने कसले ठेवणीतून शोधून काढ्ले होते.( सांगत नाही कारण तिने जर हा लेख वाचला ना तर मला कॉपिराइटच्या कलमाखाली अटक करेल) .. हाहा हा. त्यानंतर मग काय विचारू नका ज्याना बाळ व्हायचे ते सगळे हिच्याकडे धाव घेतात छान छान नावासाठी..  पण मी, प्रणव (माझा धाकटा भाऊ) तिच्या बाळाचे नाव "गुंडी" ठेवले. आमची मस्त गट्टी जमली... गुंडी,प्रज्ञा ताई, आई आणि मी. रोज गुंडी माझ्या आईबरोबर खाली जाणार आईला शाळेत जायच्या वेळी आणि माझ्याबरोबर बॅक टू घर.

मागच्या महिन्यात प्रज्ञा ताईला महाराष्ट्रातल्या १३ जिल्ह्यान्मधून निवड होऊन "रोटरी ग्रुप स्टडी एक्स्चेंज " साठी अमेरिकेला पाठवले.

आता मात्र मी दिल्लित राहात असल्यामुळे सारखे वरचेवर जाणे होत नाही पुण्याला पण "सेलफोन" आहेच मदतीला.

अजून काही आठवले कि लिहिनच पण आता थांबवते.. हॅटस ऑफ टु प्रज्ञा ताई.. यु रॉक "