उशाशी.. तुझ्या आठवणींची कविता...
चुरगळलेल्या कागदावर उमटलेली गेयता..
त्या बोळ्यात लपलेली सोनचाफ्याची पाकळी...
वाळलेली.. सुकलेली.. सुरकुतलेली शून्यता
आज भेटशील.. उद्या भेटशील... नको तेव्हडी आतुरता
तू मात्र निष्ठूर... ना चिट्ठी ना पत्ता
पारावरच्या चाफ्याला अजुनही सोनेरी कळ्या येतात
कळ्यांच्या पाकळ्या होउन मातीमध्ये मिसळतात
अन वाऱ्यासंगे उडत उडत.. तुझ्या दारावरून जातत
त्यांनाही बहुदा तुझे कुरळे केस आठवतात
कारण दारासमोरून जाताना ते लाजेने गळून पडतात
अन संकोचलेल्या मनाने गालातच हसतात