रसमलाई

  • १० ते १२ तयार रसगुल्ले
  • १लिटर जास्त फॅट असलेले दूध
  • (जर्मनीत कोंडेन्स्ड मिल्श म्हणून ४%, ७. ५% व १०% फॅट असलेले दूध मिळते त्यातील ७. ५% वाले दूध मी घेते. )
  • साखर १/२ ते ३/४ वाटी
  • बदाम पिस्ते काप, वेलचीपूड
३० मिनिटे
४ जणांना

दूध साधारण पाउण लिटर होईल असे आटवावे. कोंडेन्स्ड मिल्श घेतले असेल तर साय जमू लागली की ती लगेच मोडावी व गॅस बंद करावा. त्यात साखर घालून ढवळावे. बदाम पिस्ते काप, वेलचीपूड घालावी व ढवळावे. गार होऊ द्यावे. रसगुल्ले पाकातून काढून घ्यावेत आणि दूधात घालावेत.थंडगार करून खावेत.
 (ह्यातल्या उरलेल्या पाकात नंतर गुलाबजाम करता येतात हा सुगरणीचा सल्ला,  )

रसगुल्ले घरीही करता येतात(रेसिपी देईन हवी असल्यास) पण एकटे राहणाऱ्यांसाठी, वेळ वाचवण्यासाठी आणि नवस्वयंपाक्यांसाठी तयार रसगुल्ले बाजारातून आणणे हा सोपा पर्याय आहे.
भारतात तर प्रश्नच नाही पण भारताबाहेरही इंडियन शॉपमध्ये टिंड रसगुल्ले मिळतात तेव्हा रसमलाई करणं एकदम सोपे आहे,  

स्वप्रयोग