'सरकारी कामकाज मराठीतच चालत असल्याने मायमराठी शिका' : मुख्यमंत्र्यांचे आवाहन.

ही माहिती मला मटाच्या आजच्या अंकात वाचायला मिळाली.

ही पाहाः

सरकारी नोकरीसाठी मायमराठी शिका!

बातमीचा गोषवारा असा:

बातमीत म्हटल्याप्रमाणे  क्रॉफर्ड माकेर्ट भागातील हाज हाऊसमध्ये अल्पसंख्याक शिक्षण संस्थांच्या प्रश्नाबाबत आयोजिण्यात आलेल्या राज्यव्यापी परिषदेस मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री बोलत होते. 'सरकारी नोकरभरतीत मुस्लिमांना योग्य प्रतिनिधीत्व मिळायला हवे, हे सरकारचे धोरण आहे. पण या नोकऱ्यांना पात्र ठरण्यासाठी मराठीचे शिक्षण आवश्यक आहे.' असे त्यांनी सांगितले व स्पधेर्त टिकून मुख्य प्रवाहात येण्यासाठी राज्यातील मुस्लिमांनी 'मायमराठी' आत्मसात केलीच पाहिजे, असे कळकळीचे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी 'अल्पसंख्याकांची वेदना आणि शासनाची संवेदना' या पुस्तकाचे प्रकाशन झाले.

पोलिस भरती प्रक्रियेत एक अल्पसंख्याक अधिकारी नियुक्त केला जाईल, असे उपमुख्यमंत्री आर. आर. पाटील यांनी ह्या कार्यक्रमात सांगितले.


सरकारी कामकाज मराठीतच चालते असे मुख्यमंत्री का म्हणाले असावेत? नेमके कोणते सरकारी कामकाज मराठीत चालते आणि कोणते चालत नाही, असे तुम्हाला वाटते? असा तुमचा अनुभव आहे?

पूर्वी अ. र. अंतुले महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असताना त्यांनीही उर्दू भाषक अल्पसंख्यांकांना मराठी शिकण्याचे आवाहन केले होते हे तुम्हाला आठवते का?

एक अल्पसंख्यक अधिकारी नियुक्त केला जाईल ह्या उपमुख्यमंत्र्यांच्या सांगण्याचा अर्थ काय? एरवी अल्पसंख्यक व्यक्तीची नेमणूक पोलिस अधिकाऱ्यात होत नाही / नव्हती का?

'अल्पसंख्याकांची वेदना आणि शासनाची संवेदना' हे पुस्तक सरकारी प्रकाशन आहे, की खाजगी? कुणाच्या वाचनात हे पुस्तक आले तर कृपया त्याविषयी माहिती द्यावी, ही विनंती.