उठ बाबा आता,
नुसता उठू नकोस तर जागा हो.
सकाळ होण्याची वाट कसली पाहतोस?
तू उठशील तेव्हाच खरी सकाळ.
तू आमच्याच आत आहेस, असं किर्तनकार म्हणाले
संतांचा दाखला देऊन.
तू उठलास तर काहीतरी बदल घडेल.
जे चाललय त्यावरून ही खात्रीच आहे की तू झोपलेला आहेस.
आमचं काय चाललय, आम्ही काय करतोय...
ते आमचं आम्हालाच कळत नाहीए.
आमच्या अशा वागण्याने एक दिवस
अस्तित्वच संपेल आमचं साऱ्यांच.
मग हजारो वर्षानंतर कुठूनतरी, कोणीतरी यान पाठवेल
जीवाश्म्यांचे पुरावे शोधायला,
इथल्या रेती, वाळूत.
या धरेचा 'मंगळ' होण्याआधी उठ.
पण तुझी जर तशीच इच्छा असेल तर मग प्रश्नच मिटला.