चालता चालता तू वळे ग अवचित
कैक जखमी पथी, हे नव्हे गे उचित
मोकळ्या कुंतला, घाल आवर जरा
गुंतले भ्रमरही, कोसळेच निपचित
ओढता ओढणी, थांब ना चंचले
फास लागे कुणा, हाय... गेला खचित
या अदा, हा बहर, चोरटी ती नजर
वाटते जिंकलो... तोच हो साफ चित
चाल चालू नको, जीवघेणी अशी
बैसतील मजसम, रोज कवने रचित