कॉलेजातली... फार्फार जुनी कविता
तुझ्या आठवणी बहरताना...
गुलमोहराची पखरण मोहरते.... सर्वांगी
फुलला चाफा भिनतो नसानसात
तृणपुष्पासम डवरतं मन
आणि डोलतात मागेपुढे..... सावलीसारख्या
.............................. तुझ्या आठवणी
तुझ्या आठवणी ओघळताना...
ग्रीष्म धगधगतो गुलमोहरात..... प्रखरतेने
फुलल्या चाफ्याच्या पानगळीची जाणिव होते
डोळ्यातल्या रात्री टपोरतात दवं बनून तृण्पुष्पावर
आणि विरतात अंधारात..... सावलीसारख्या
............................. तुझ्या आठवणी
पण तरीही संचारतात माझ्या रोमारोमांतून
कस्तुरीगंधासारख्या............................. तुझ्या आठवणी