आयुष्य वसूल करू या..

मला खुप वाटायचं, आपण कमावतो जो पैसा. तो खर्च केल्यावर
वसुल झालाच पाहिजे! हो ना? माझं म्हणणं पटतय ना तुम्हाला?
पण, मग या फुकट मिळालेल्या आयुष्याबद्दल कधी विचार केलाय का?
आपण घेतलेली कपडे चांगली नीघाली म्हणजे झाले पैसे वसुल..............
एखादं स्वस्तातलं घड्याळ खुप टिकलं म्हणजे झाले पैसे वसुल.... हो ना?
आयुष्यभर काय फक्त पैसे वसुल करत बसणार आहात का?
क्रेडिट कार्डांवर उधळणार आहात का?
का तो अतीरिक्त पैसा कुठल्याशा खात्यात सडवणार आहात का?
एक सांगू ईथे तुमचे पैसे नको आहेत कोनाला, आणी तुम्ही दिले तरी
कोनी घेनार ही नाहीये!
कारण ईथे कोणी पैसे वसुल करायला आलेलं नाहीये, अन कोणी येउ ही नये!
मला अता वसुल करायचयं आयुष्य, बोला आहे तुमची तयारी?
पैसे वसुल करण्यापेक्शा खुप सोप आहे अयुष्य वसूल करणं!
चला तर मग आयुष्य वसूल करुयात....
रस्त्यावरच्या एखाद्या  लहान मुलाला एक वडा-पाव खाउ घाला.......
एखाद्या आजींना रस्ता पार करून द्या.....................................
एखाद्या आजोबांना एसटीची पाटी वाचून द्या..............................
नसेलचं कुणाची ऐपत अन असतीलच तुमच्याकडे जास्तीचे पैसे तर
त्याची शाळेची फी भरून द्या..............................................
ए सी मधून बाहेर पडल्यावर जर दिसलाच कोणी दु:खी तर थोडा
वेळ का होईना त्याच्या पाठीवर मायेचा हात तर फिरवा...............
आपल्या आजु-बाजुची परिस्थिती बिघडत चाललीये, मल्तिप्लेक्स मध्ये
स्वदेस, लगान, चक दे पाहून फक्त हळ- हळ व्यक्त करण्यापेक्शा एखादा
कबीर... एखादा भुवन..... होण्याचा प्रयत्न तर करू या....................
पैसे कमावून माणुस श्रीमंत होत नसतो!
माणुस श्रीमंत होतो माण्सं कमावुन!
असेल तुमची तयारी तर मग खरच चला....................................
आयुष्य वसूल करू या!