तुझे जवळ असणे
शीत शशी किरणे
रातराणीचे हासणे... गंध वाऱ्यातूनी
तुझे जवळ असणे
सप्तसूरांचे गाणे
कोकीळ तराणे.... आम्रवनातूनी
तुझे जवळ असणे
इंद्र्धनू देखणे
निसर्गाचे देणे...... नभ मेघातूनी
तुझे जवळ असणे
स्वप्नातले चांदणे
संगमरवरी ताज लेणे... धुंद पाण्यातूनी
तुझे जवळ असणे
नक्षत्र तोरणे
डोळ्यांचे पारणे.... फिटे मनातूनी